Sunday, July 28, 2019

समस्त सणगर समाज, पुणे

समस्त सणगर समाज, पुणे“सणगर समाज सांस्कृतिक भवन व नवीन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर“ बांधण्यासाठी समाज बांधवांस आर्थिक मदतीचे आवाहन ...
थोडक्यात पार्श्वभूमी :
(१) समस्त सणगर समाजाच्या तत्कालीन पंचांनी ५४१, गुरूवार पेठ, पुणे ही जागा श्रीमती धोंडाबाई बाबाजी राऊत यांच्याकडून ( संदर्भ-खरेदी दस्त खंड क्र. ३६२६/१९०४, दि.‪१८/११/१९०४‬ ) रक्कम रूपये ५००/- घेवून श्री विठ्ठल आणि श्री रूक्मिणी या देवांच्या मुर्ती असलेली मिळकत खरेदी केली.
(२) मा. धर्मादाय उप-आयुक्त यांचेकडील सार्वजनिक न्यास नोंदवहीत दि. ३०/०६/२०१६ नुसार समस्त सणगर समाज,पुणेसाठी घटना व योजना मंजूर करण्यात येऊन जुन्या विश्वस्तांची नांवे कमी करण्यात आली व नवीन १४ विश्वस्तांची नांवे दाखल केली.
(३) नगर भूमापन कार्यालयात नवीन विश्वस्तांची नांवे नगर भूमापन क्र. ५४१ या मिळकतीवर दि. ‪०७/०९/२०१७‬ रोजी मिळकत पत्रिकेवर लावण्यात आली.
(४) सध्या सदर जागेवरील ११५ वर्षांची जुनी इमारत पडण्याच्या अवस्थेत आहे. सदर जागेवरील इमारत दुरूस्ती/जिर्णोध्दार वा नव्याने बांधणी केली नाही तर सदर जागेतील इमारत व मंदिर केव्हाहि जमिनदोस्त होऊ शकेल.
(५) त्यामुळे पुणे या मध्यवर्ती ठिकाणी समाजाची असलेली जागा फक्त जिर्णोध्दार करण्यापेक्षा आहे त्यांच ठिकाणी नव्याने सर्व समावेशक व सर्व सोईने युक्त अशी “सणगर समाज सांस्कृतिक भवन व नवीन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर“ बांधण्याबरोबरच या ठिकाणी संस्थेचे कार्यालयाबरोबरच वारीच्या वेळी वारकऱ्यांची थांबण्यासाठी व्यवस्था, छोट्या कार्यक्रमासाठी हाॅल, गरजू विद्द्यार्थ्यासाठी राहण्याची सोय, समाजातील लोकांना अडीअडचणीच्या वेळी हक्काचे थांबण्यास ठिकाण, आरोग्य केंद्र,अभ्यासिका, वाचनालय व या ठिकाणी काही समाजोपयोगी काम करण्यासाठी जागा असावी अशा दृष्टीने मा. धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने पुणे महानगरपालिकेकडे बांधकाम आराखडा सादर करून त्यास महानगरपालिकेची दि. ०४/०२/२०१९ रोजी बांधकाम परवानगी घेण्यात आली आहे.
(६) पुर्वीच्या काही लोकांनी त्यांच्या अधिकारात ठेवलेल्या भाडेकरूकडून सदर जागा खाली करून घेण्याची प्रक्रियाही चालू आहे.
समस्त सणगर समाज सांस्कृतिक भवन व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीरासाठी देणगी देणाऱ्यासाठी आकर्षक योजना :
(१) बांधकाम निधी म्हणून घरटी रू. ५,०००/- इतकी रक्कम जमा करण्यात यावी व जे देणगीदार रू.५,॰॰॰/- वा त्यापेक्षा जास्त बांधकाम निधी देतील त्यांची नांवे सन्माननीय देणगीदार म्हणून नवीन इमारतीतील संस्थेच्या भिंतीवर लावण्यात असा निर्णय विश्वस्तांच्या बैठकीत व सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
(२) संस्थेच्या नवीन बांधकामातील सभागृह, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील खोल्यांच्या बांधकामाचा खर्च जो समाज बांधव वा समाजाबाहेरील दानशूर व्यक्ती करेल त्याच्या नावाने त्या त्या खोलीबाहेर त्याच्या नावाचा कायमस्वरूपी बोर्ड त्या त्या खोलीबाहेर लावण्यात येणार आहे. साठीही समाज बांधवांनी सढळ हस्ते मदत करावी अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे.
(३) जे समाज बांधव रू. २५,०००/- वा जास्त देणगी देतील, त्यांची नावे ब्रांझ अक्षरात, जे समाज बांधव रू. ५०,०००/- वा जास्त देणगी देतील, त्यांची नावे रौप्य अक्षरात व जे समाज बांधव रू. १ लाखापेक्षा जास्त देणगी देतील त्यांची नावे सुवर्णाक्षरात सभागृहातील भिंतीवर लावण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रकांत सणगर
अध्यक्ष, समस्त सणगर समाज, पुणे